बोदवड तहसीलदारांनी गुजरात मधून वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक सोडले ? पासवर भाडेपट्टा शेवटची मुदत तारीख नव्हती !

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

गुजरात मधील निझर तालुका जिल्हा तापी येथून ३० जून २०२० रोजी वाळूने भरलेले दोन ट्रक ताड पत्रीने झाकून वाहतूक करतांना महसूल कर्मचाऱ्यांनीपकडले असता ते दोन ट्रक तहशीलच्या आवारात आणून त्यांची पडताळणी करून तहसीलदार हेमंत पाटील यांनी सोडून दिले.

या बाबत अधिक माहिती अशी की दि ०१ जुलै २०२० रोजी नशिराबाद बोदवड मलकापूर राज्य मार्ग क्र २७० या रस्त्याने वाळूने भरलेले ट्रक क्र एम एच –28 ए बी–877 6 व ट्रक क्र ,एम एच –15 ए के –5970 तहशीलच्या आवारात आणून दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास पडताळणी केली असता त्या ट्रक मध्ये वाळू भरलेली होती,गुजरात राज्यातून निझर जिल्हा तापी.

तापी नदीच्या पात्रातील सर्वे क्र,112 व 115 यागटातून भरून भरून त्या ट्रक मधील वाळूचे वजन खेतिवाडी बाजार समिती च्या भुईकाट्यावर (टोलकाट्यावर) केल्याचे आढळून आले,ही वाळू महाराष्ट्रातील बुलढाणा येथील जुनेदभाई यांचेकडे जात होती.

गुजरातमधील रेती पुरवठा करणारे भाडेपट्टा धारक रामेशभाई उखभाई वास वा ,अंतुर्ली निझर यांचेकडील रॉयल्टी पास जिओ लॉजी एन्ड मायनिंग रॉयल्टी पास क्र. क्यू एल —260100181400004475 या क्रमांकाचा पास होता,त्या पासवर चालकाचा परवाना क्रमांक नव्हता,भाडेपट्टा धारकाची शेवटची भाडेपट्टा अंतिम तारीख चा उल्लेख केलेला आढळून आल्या चे दिसून आले नाही.

जर या ट्रक ला वाळू वाहतुकीची परवानगी आहे तर ताडपत्रीने मागील। बाजूस झाकून का ठेवतात,महाराष्ट्रात जळगांव ची गिरणा नदीची रेती मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना परराज्यातून वाळू वाहतूक का? देशात लॉक डाऊन असतांना ,अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रक मधून वाळू वाहतूक करण्यास परिवहन विभागाची परवानगी आहे का?या वाळू वाहतुकीची तहसीलदार व पोलिसांनी संयुक्त पडताळणी करून देखील त्यांना भाडेपट्टा धारकाची अंतिम शेवटची मुदत पास वर उल्लेख केली नव्हती ती दिसली नाही का?

हा प्रश्न उपस्थित केला जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here