बोदवड सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदोपत्री दूतर्फा १३ कोटी वृक्ष लागवड घोटाळा उघडकीस…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड तालुक्यातील नाडगाव ते चिंचखेड सिम रस्त्यावरील २०१८ – २०१९ या वर्षांत बोदवड सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या दुतर्फा 13 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत पाच हजार वृक्ष लागवड घोटाळा उघडकीस आला आहे, याबाबत राजू नीना इंगळे रा,चिंचखेड सिम यांनी दि 13 /10/2010 रोजी तक्रार केली.

असता या तक्रारीची तात्काळ दाखल घेऊन दि 16/10/2020रोजी प्रतक्ष वन परिक्षेत्र अधिकारी श्री ढा करे यांनी दुतर्फा वृक्ष लागवड ची पाहणी वन कर्मचारी,वनरक्षक वनपाल,समवेत पाहणी केली या पाहणीत बऱ्याच प्रमाणात ट्री गार्ड, दिसून आले नाही, ट्री गार्ड चोरीला गेल्याचे सांगण्यात आले,

कामावर अधिकृत जॉब कार्ड धारक मजूर लावण्यात आले नाही,सादर चे काम रोजगार हमी योजना अंतर्गत असून या कामावर नाडगाव कोल्हाडी, चिंचखेड सिम येथील मजूर दिसून आले नाही, या कामावर साळशिंगी येथील मजूर कामावर दिसून आल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे,

एकंदरीत बोदवड सामाजिक वनीकरण विभागाने सन2018 ते2019 या वर्षातील 13 कोटी वृक्ष लागवड संशयास्पद असून शेलवड येथील60 हजाराच्या वर वृक्षारोपण ची चौकशीसुरू करण्यातअली आहे,चौकशीचा अहवाल आज पर्यंत गुलदस्त्यात आहे,संबंधितचौकशी अधिकारी चौकशी अहवाल विभागीय वन अधिकारी जळगांव यांना सादर करतात की दाबून टाकतात याकडे तालुकावशियासह वृक्ष प्रेमींचे लक्ष लागून आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here