बोदवड नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्या नोटीसीला अनधिकृत बांधकाम धारकाकडून ठेंगा…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

बोदवड नगर पंचायत हद्दीतील गट नं825 प्लॉट नं 3, 3पैंकी व4 घर नं 5008/2 व5009/2 याजागेवर जितेंद्र देवानंद भोई वगैरें2 हे त्यांच्या जागेच्या व्यतिरिक्त रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे.

अशी तक्रार दिली असून या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यधिकारी चंद्रकांत भोसले यांनी प्लॅट धारक जितेंद्र देवानंद भोई व इतर2 यांना 29 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम अंतर्गत नोटीस वाजवली असता नोटिशीचे गांभीर्य न घेता कामकेले आहे,

बांधकाम धारक जितेंद्र देवानंद भोई यांस29 ऑक्टोबर रोजी दिलेल्या नोटीसीत नमूद केले आहे की सुधारित बांधकाम परवानगी दिली असता त्याचे उल्लंघन करून बांधकाम करीत आहात,याचा अर्थ असा होतो की नगर पंचायत प्रशासनाचा धाक उरलेला नाही,

प्रभाग क्र पाच मधील महिलांचे शौचालय पाडले असून अद्याप नगर पंचायतीला शौचालय पडणारा सापडला नाही ,किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, अनधिकृत बांधकामे करणारे अरेरावीची भाषा करतात.

असे तक्रार अर्जात मनोजशिंग राजपूत, अमोल बुंदले,मनोज पाटील,मोहन कासार, विनोद भिसे,यांनी म्हटले आहे, या बांधकामाचा ठेका ऐका नगर सेवकाने घेतला आहे अशी जनतेत चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here