बारव्हा केंद्रांतर्गत अनागोंदी प्रकरण भोवले…विजयलक्ष्मी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त…

प्रशासकाची नियुक्ती…सहाय्यक निबन्धकांचे आदेश

लाखांदूर:-संस्थेन्तर्गत गत रब्बी हंगामातील आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत ग्रेडर कडून नियमबाह्य बेकायदेशीर कारभार केल्या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिका-यांच्या चौकशी अहवालानुसार लाखांदूर येथील दि.विजयलक्ष्मी सह.संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही लाखांदरचे सहाय्यक निबन्धकां च्या आदेशानुसार करण्यात आली असुन संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती देखील करण्यात आल्याने बारव्हा केंद्रांतर्गत अनागोंदी प्रकरण भोवल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्राप्त आदेशानुसार दि.विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था लाखांदूर अंतर्गत उन्हाळी हंगामात तालुक्यातील बारव्हा/जैतपुर येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.

मात्र या केंद्रावरील ग्रेडर कडून बाजार समितीच्या टोकन विना धानाची खरेदी करणे, आर्द्रता व ओलावा युक्त धानाची खरेदी करणे, खरेदी रजिस्टर अद्यावत नसणे, खरेदी केलेल्या धानाची ऑनलाइन नोंद न करणे, शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत धानाचे मोजमाप करणे, शेतकऱ्यांकडून ज्यादा हमाली वसूल करणे यासह अन्य आरोपांच्या तक्रारीची तत्कालीन साकोली चे उपविभागीय अधिकाऱ्यांनी गत 5 जून रोजी चौकशी केली होती.

यावेळी चौकशी अधिकाऱ्यांनी थेट बारव्हा/जैतपुर या केंद्राला भेट दिली असता चौकशीदरम्यान सदरचे आरोप सिद्ध झाल्याने तसा अहवाल जिल्हा पणन अधिकारी व सहाय्यक निबंधकांना देण्यात आला होता. त्यानुसार या केंद्रावरील ग्रेडर धनराज पाऊलझगडे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून 50 हजार रुपयाचा दंड व सुमारे 827.60 क्विंटल धान्याची देय असलेली रक्कम वसुलीचे आदेश देण्यात आले आहे.

एवढेच नव्हे तर या केंद्राअंतर्गत ग्रेडर कडून झालेल्या गैरकारभार प्रकरणी येतील संचालक मंडळाला दोषी धरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कायद्यान्वये पुढील पाच वर्षासाठी संचालक पदावरून निष्कासित करण्यात आले आहे. दरम्यान सदर आदेश लाखांदूर येथील सहाय्यक निबंधकांनी गत 26 ऑगस्ट रोजी निर्गमित केला असून त्यानुसार या संस्थेवर प्रशासक म्हणून सहकार अधिकारी श्रेणी 2 गोपाल वेलेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here