अडीच कोटीचे रक्त चंदन जप्त, महात्मा गांधी पोलीसांची मोठी कारवाई…

सांगली – ज्योती मोरे

मिरज गांधी चौकी पोलिसांनी ‌अडीच कोटींचे चंदन जप्त केले आहे.१ टन वजनाचे ३२ वोडके असून रक्त चंदन जप्त केले आहे.बेगलोर येथून एका टेम्पोतून टेम्पो नंबर केए २३ ६९०० यातून हे रक्त चंदन येत होते आणि कोल्हापूर च्या दिशेने जात असताना हे रक्त चंदन मिरज धामणी रोडच्या ठिकाणी जप्त केले आहे.यासीन ईनायतुल खान यास महात्मा गांधी पोलिसांनी अटक केली असून पश्चिम महाराष्ट्रातील महात्मा गांधी पोलीस ठाण्याची मोठी कारवाई आहे.

यामध्ये एक गाडी आणि रक्त चंदन सहीत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हा अधीक्षक दीक्षीत गेडाम यांनी दिली आहे.मिरज महात्मा गांधी पोलीस चौक मध्ये प्रेस काॅन्फरंन्स घेऊन माहिती दिली.

ही कारवाई महात्मा गांधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे आणि महात्मा गांधी पोलीस चौकीच्या स्टाफनेही कारवाई केली आहे.ह्मा प्रकरणामुळे आंतरराज्य रँकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे असे ही पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here