औरंगाबादमध्ये राजयोध्दा गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान संपन्न…

औरंगाबाद – विजय हिवराळे

राज्यासह देशामध्ये कोरोना मुळे जे लाॅकडाऊन केले होते त्यामुळे जनता घराबाहेर निघू शकत नव्हते त्याचाच परिणाम हा रक्तपेढ्यावर झाला व सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला याच गोष्टीचा विचार करून राजयोद्धा गणेश मंडळाच्या वतीने आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी शिवशंकर कॉलनी येथे अमृता ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्त संकलन करण्यात आले.

आज या ठिकाणी 25 ते 30 रक्तदात्यांनी आनंदाने रक्तदान केले…

यावेळी माजी महापौर त्र्यंबक तूपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नवीन गणेश महासंघ संस्थापक अध्यक्ष बबन डीडोरे, संजय शिंदे, अनिल थोटे , अमृता रक्तपेढी चे विशाल जैन,गणेश मंडळ पदाधिकारी अजय दहिफळे, प्रतीक जाधव, प्रदीप टाक,यांच्यासह नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here