सेवा सप्ताहानिमित्त भाजपच्या युवा मोर्चाकडून बोईसरला रक्तदान शिबीर…

मनोर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यस्तरावर सेवा सप्ताह आयोजन करण्यात आले आहे.सेवा सप्ताहानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाकडून बोईसर शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 57 दात्यांनी रक्तदान केले.

यावेळी भाजपचे माजी महाराष्ट्र प्रदेश सदस्य बाबजी कठोले,महाराष्ट्र प्रदेश सचिव अर्चना ताई वाणी,जिल्हा संगठन सरचिटणीस संतोष जनाठे,माजी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती अशोक वडे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर पाटील, शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील,बोईसर मंडळ अध्यक्ष जितेंद्र संखे,

जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे, चेतन धोडी,पंचायत समिती सदस्य सलोनी अशोक वडे, अजय दिवे,माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना संखे, माजी पंचायत समिती सदस्य वीणा देशमुख बोईसरच्या सरपंच वैशाली बाबर,उपसरपंच देविका मोरे,ग्रामपंचायत सदस्य तेजस काठे,मंडळ सरचिटणीस आशिष संखे, क्रीपाल रावत,प्रशांत संखे,रुपेश संखे,गणेश संखे,अल्पेश मोरे,सचिन संखे कुणाल संखे,अमित संखे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here