राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचेवतीने जागतिक कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न…

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पावर याच्या आवाहनानुसार रा.का,कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे व रा.का प्रदेश सरचिटणीस प्रा. विश्वनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष धमेन्द्र शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली काल 1 मे जागतिक कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिर राधा कृष्णा टाँकीज, समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यातच तिथे रक्तसाठा उपलब्ध होत नाही तर कुठे ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत असल्याने रुग्ण मृतसंख्या वाढत असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक तथा माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेल्या आवाहनानुसार अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल च्या वतीने जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन रा कॉ कामगार सेल जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र सिरसाट यांचे हस्ते करण्यात आले.

या आयोजित शिबिराला ,पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष राहूल इंगोले, युवा अधोजक आंनद वानखडे ,सामाजिक.न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब इंगोले ,प्रमोद पळसपगार याच्या उपस्थीतीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शिबीर यशस्वी केले .रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कामगार सेलचे डॉ रेखाताई घरडे,जिल्हा अपाध्यक्ष प्रमोद गवई , आशिष खिल्लारे, अमेश खंडारे,

वसंत अढाऊ (पाटील )अज्वल पोहरे,अमन घरडे, बंटी गोपनारायण, अनिकेत इंगळे,विजय भगत,योगेश मस्के, गौरव राऊत,निलेश आगरकर,शुशील घनबहादुर अंकुश जंजाळ, सौरभ पाटील, श्याम रामटेके, चंदन शिरसाट, सौरभ जामनीक, रोशन इंगोले,सतीश खरात,सुनिल तायडे, शिला दादा वरघट, तारिक भाई,बाळू पाटीलप्रकाश सोनोने, अमित खांडेकर,गजानन वानखडे, प्रमोद बनसोड ,सावळे मामा आदिनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here