राजगुरूनगर ( पुणे ) : अटत नसतो रक्ताचा झरा, नेहमी गरजूंसाठी रक्तदान करा तसेच सध्या सुरू असलेल्या कोविडच्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा व्हावा, आणि त्यातून त्यांचे प्राण वाचले जावेत, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून येथील खेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख,पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे, युवा मोर्चा प्रभारी प्रवीण काळभोर,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, जिल्हा उपाध्यक्ष संजय रौंधळ, उपाध्यक्ष सुनील भाऊ देवकर, राजगुरुनगर शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे,पोलीस पाटील संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या सुरू असलेल्या वैश्विक कोरोनाच्या महामारीने त्रस्त झालेल्या रुग्णांना रक्ताची अत्यन्त गरज असते, यासाठी भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.तसेच यावेळी पोलीस पाटलांनी उत्कर्ष काम केल्याने त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष किरण दगडे यांनी सांगितले की, सध्याच्या काळात अनेकांनी मदतीची गरज आहे, अश्या लोकांना भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने मदत करण्याची कामे सर्वांनी स्वयंफुर्तीने करावी असे आवाहन केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केले.तर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष काळूराम पिंजण यांनी आभार मानले.