प्रहार जनशक्ति पक्षा तर्फे रक्तदान शिबिर…

दानापुर – गोपाल विरघट

महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून दानापुर येथील प्रहार जनशक्ति पक्षा तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.कोरोनाच्या काळात रक्ताचा
तूटवडा भासत असल्याने दिसुन येत आहे.या संकटाच्या काळात जिल्हातील अनेक रक्तपेठया मधील रक्ताचा साठा कमी झाला आहे, त्यामुळे रुग्णाना वेळेवर रक्त मिळत नाही.

कोरोनाच्या आपत्ती काळातील हि गरज लक्षात घेता दानापुर गावात नव्याने स्तापित प्रहार जनशक्ति पक्षाने पुढाकार घेत गावातील खोडे प्रतिष्ठान येथे रक्तदान शिबीरचे आयोजन दि. 13 जून रोजी सकाळी 11 वाजता केले.छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिबिराला सुरुवात केली, शिबिराचे उद्घाटन दानापुर सरपंच सौ. सपना वाकोडे, सुशील पुंडकर, पो.पा. संतोष माकोडे यांनी केले,

यावेळी शिबीरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामीण रुग्णालय अकोला येथे रक्त संकलित केले रक्तदात्यांना प्रमाण पत्र देउन गौरव करण्यात आला . शासनाच्या आदेशानुसार सर्व नियम पाळून शिबीर घेण्यात आले, यावेळी प्रहार जनशक्ति पक्षाचे कपिल फोकमारे,मंगेश पाटील, पवन गावत्रे, तर आयोजन नितिन घायल, विपुल कु-हाडे, कैलाश ढगे, मोहन वरणकार, शुभम थोटे, पंकज सावळे, गोपाल इनामे, पवन कोकाटे, प्रतिक इंगोले, ओम येऊल, अरुण गाडगे, यांच्या सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here