प्रतिनिधी : आकाशझेप फाउंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-७५ आणि ७३ व्या गणराज्य दिनाच्या राष्ट्रीय पर्वावर तुरक कॉम्प्लेक्स व गडमंदिर रामटेक येथे ऐच्छिक रक्तदान शिबीर व समाजसेवक तसेच शिबीर आयोजकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. इरफान अहमद, प्रमुख मार्गदर्शक एसडीओ वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, ॲड. महेंद्र येरपुडे, नगरसेवक सुमित कोठारी यांनी बोलतांना आकाशझेप द्वारा कार्यान्वित मानवतावादी राष्ट्रीय कार्याचे कौतुक केले.
या शिबिरात ८१ व्यक्तींनी रकदान केले. यावेळी जिल्ह्यातील शिबीर आयोजक जितेंद्र कोसे रामटेक, ग्रामीण रुग्णालय पारशिवनी, श्री गुरुदेव सेवा समिती पालासावळी, अशोक टोहने सिंगारदीप, मनाम एकता मंच नागपूर, कमलताई रामदास मेश्राम नागपूर, सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट पारशिवनी, ग्राम पंचायत कर्मचारी युनियन रामटेक तालुका, आशिष खोब्रागडे पारशिवनी, समता सैनिक दल नागपूर, पोलिस पाटील संघटना, पारशिवनी, कल्याणमित्र बौध्द बिहार शितलवाडी, आंबेडकरी युवा मंच रामटेक तालुका, अपोलो क्लासेस अँड करिअर अकॅडमी साटक, आदिवासी माना जमात विदयार्थी युवा संघटना, अली ग्रुप कामठी, किंमतकर हॉस्पिटल रामटेक, मनाम एकता मंच दुकानदार संघ रामटेक यांना ‘समाज भूषण’ तर पत्रकार नत्थूजी घरझाडे, अविनाश शेंडे, त्रिलोक मेहर, राकेश मर्जिवे, जगदीश सांगोडे, अनिल वाघमारे, राजू कापसे, सचिन चौरसिया, पंकज बावनकर, डॉ. समीक्षा गणवीर नागपूर, डॉ. सीमा मिणा नागपूर, सिस्टर वंदना भगत नागपूर यांना ‘जीवन गौरव’ आणि नियमित रक्तदाता सन्मान प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (आयजीजीएमसी) नागपूर व सिंहो हॉस्पीटल नागपूर येथील वैद्यकीय चमूने उत्तमरित्या रक्त संकलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार यांनी केले. सूत्रसंचालन आम्ही भारतीय आकाशझेपचे संस्थापक सचिव व अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष दिलीप पवार यांनी केले. यावेळी पंचायत समिती सभापती कलाताई ठाकरे, आकाशझेपचे प्रा. श्रीकांत येरपुडे, अर्चना कडबे, प्रा. सुनील वरठी, वैभव तुरक, शैलेश वाढई, सामाजिक कार्यकर्ता गोपी कोल्लेपरा, ज्योती कोल्लेपरा, डॉ. विजय वनवे, आकाशझेपचे माजी संस्थापक संचालक गुणवंत दुपारे, आजीवन सदस्य सुमित पटले, प्रफुल्ल राऊत, अविनाश मैंद, प्रफुल्ल ठाकूर, सतीश सुरूसे, दिपा चव्हाण, शुभा थुलकर, सुषमा गजभिये, पंकज माकोडे, ऋषिकेश किंमतकर, दुतियोधन कडबे, वेदप्रकाश मोकदम, रुस्तम मोटघरे, मंगला कुल्लरकर, सुरेंद्र सांगोडे, अनिकेत मैंद, राहूल गजभिये, अंकुश मोटघरे आकाश लेंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. एकता मंचचे सचिन वालुकर, उमेश पापडकर, कृष्णा कावळे, प्रफुल्ल अनकर, रमेश उमरकर, जितेंद्र वालुकर, रवि पगाडे, अभिलाष ससणकर, राहुल लांजेवार आणि आकाशझेपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
