जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक मध्ये भाजप चा दारुन पराभव, महाविकास आघाडीची मुसंडी विजयी जल्लोष…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची गेली आठवडाभर रणधुमाळी सुरू होती.रविवारी जिल्हा बँक साठी मतदान पार पडले.आणि आज मंगळवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक निकाल लागला.त्यामध्ये महाविकास आघाडी च्या सहकार पॅनेल ने १७ जागांवर मुसंडी मारली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विकास पॅनेल ला अवघ्या ४ जागांवर विजय मिळाला आहे.या जिल्हा बँक निवडणूक मध्ये महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीचा दारुन पराभव केला आहे.पालकमंत्री जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

२१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली यात महाविकास आघाडी राष्ट्रवादी -९ ,काॅग्रेस – ५ ,शिवसेना – ३ असे महाविकास आघाडीचे १७ उमेदवार विजयी झाले.तर भाजपाला ४ जागेवर विजय प्राप्त झाला.महाविकास आघाडी ला संपुर्ण बहुमत मिळून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ता स्थापन झाली आहे.
महाविकास आघाडी चे सर्व उमेदवार निवडून येताच कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष सुरु केला आहे.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका नंतर आता पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये सुद्धा भाजपचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसून आला.यामध्ये महाविकास आघाडी चे निवडून आलेले उमेदवार आणि मते पुढील प्रमाणे महाविकास आघाडी (सहकार पॅनेल)
१.अनिल बाबर – बिनविरोध
२.महेंद्र लाड – बिनविरोध
३.मानसिंगराव नाईक – बिनविरोध
४.सुरेश पाटील – ४३

५.पृथ्वीराज पाटील – ४१८
६.अजितराव घोरपडे – ५४
७.बाळासाहेब होनमोरे – १५०३
८.मन्सुर खतीब – १३९५

९.राजेद्र डांगे –
१०.वैभव शिंदे – ३०२
११.बि.एस.पाटील – ४१
१२.विशाल पाटील – ५२

१३.जयश्री पाटील – १६८८
१४.अनिता सगरे – १४०८
१५.मोहनराव कदम – ५३
१६.तानाजी पाटील – ४०
१७.दिलिप तात्या पाटील – १०८

भारतीय जनता पार्टी (शेतकरी पॅनेल)
१.सत्यजीत देशमुख – २७४
२.संग्राम देशमुख – २६१
३.राहुल महाडिक – ३९२
४.प्रकाश जमदाडे – ४६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here