मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे रोहामध्ये घंटानाद आंदोलन…

रायगड – किरण बाथम

संपुर्ण महाराष्ट्रात मंदिरे आणि धार्मिक स्थळे याचे दरवाजे सर्व नागरिकांना उघडावेत या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि देवस्थान याच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यात रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा अध्यक्ष अँड महेश मोहिते याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रोहा शहरातील राम मारुती चौक येथील हनुमान मंदिराच्या बाहेर युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग याच्या माध्यमातून झोपी गेलेला सरकारला जागे करण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात कुभंकरणाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या वेळी उपस्थित दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर , शहर अध्यक्ष वसंत शेलार, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, विलास डाके, रायगड युवती प्रमुख श्रद्धा घाग, जिल्हा मिडिया राजेश डाके , ज्योती सनलकुमार भांड , सीमा कोणकर यासह अनेक भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रोहा तालुक्यातील अनेक मंदिराच्या बाहेर भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन शनिवारी सकाळी 11 वाजता सुमारास करण्यात आले. या वेळी भाजपाच्या वतीने उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा दार उघड आता दार उघड घोषणाबाजी करत ढोल ताशांच्या गजरात घंटानाद आंदोलन केले. कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात जनजीवन पूर्वपदावर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने दारु मटनाचे दुकान चालू केले.

मात्र साधू संताची भुमी असलेली महाराष्ट्रातील मंदिरे मात्र बंद ठेवली. केंद्र सरकारने मंदिरे खुली करण्याचे निर्देश देण्यात आले मात्र या निद्रिस्त राज्य सरकारला सर्व सामान्य देवाचे दर्शन न घेण्यासाठी जाणूनबुजून मंदिरे बंद ठेवली.

सातत्याने राज्य सरकारने दुर्लक्ष केले त्यामुळे नाईलाजाने आम्हाला घंटानाद आंदोलन करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता तरी सर्व मंदिरे खुली करा नाहितर या पेक्षाही तीव्र आंदोलन करुच पण मंदिराचे दरवाजे सर्व भक्तांना, नागरिकांना सोबत घेऊन दरवाजे उघडल्या शिवाय राहणार नाही असा इशारा अमित घाग यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here