पीककर्ज आणि कर्जमाफीसाठी भाजपचे आंदोलन…महाविकास आघाडीचा केला निषेध…खासदार सुनील मेंढे यांनी केले नेतृत्व…

भंडारा : शेतकऱ्यांना पीककर्ज देऊन कर्जमाफीची अंमलबजावणी तातडीने करावी आणि सरसकट आकारलेले वीजबिल माफ करावे, या मागणीला घेऊन भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. यानंतर भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

■ धरणे आंदोलनात खासदार सुनिल मेंढे यांध्यासह चैतन्य उमाळकर, शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालादरे, नरेश बोंद्रे, करमचंद वैरागडे, हेमंत बांडेबुचे, मयूर बिसेन, विकास मदनकर, मंगेश वंजारी, कृष्णकुमार बत्रा, आशीष गोंडाने, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, रुबि चड्डा, मिलिंद मदनकर, अजीज शेख, राजेश टिचकुले, अजय ब्राम्हणकर, रोशन काटेखाये, भुपेश तलमले, शैलेश मेश्राम, सुदीप शहारे, अविनाश ब्राम्हणकर, अतुल वैरागडकर, राकेश बल्लमवर, किशोर ठाकरे, संजय चौधरी, अमित बिसने, विजय गभने, नंदकिशोर पारधी, सय्यद फईम, ओजल शरणागत, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, आशा उईके, गीता सिडाम, रोशनी पडोळे, माला बगमारे, प्रीती जांभूळकर, प्रीती गोसेवाडे तसेच भाजपा जिल्हा व शहर पदाधिकारी व नगरसेवक, नगरसेविका व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

■ कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र lockdown असल्यामुळे विद्युत विभागाने मीटर रीडिंग न घेता दोन महिन्याचे सरासरी बिल आकारले, आणि चालू महिन्यात बिलाची संपूर्ण आकारणी करण्यात आल्याने बिलाची रक्कम सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. तसेच अजूनही सर्व व्यवहार सुरळीत न झाल्याने बेरोजगारीचे सावट आहेच. या परिस्थितीत कुणाचेही वीज कनेक्शन खंडित करू नये तसेच वीज ग्राहकास बिलाचा भरणा हफ्त्याने भरण्याची मुभा द्यावी तसेच महत्त्वाचे म्हणजे अतिरिक्त, वाढीव आलेले बिल तात्काळ कमी करण्याच्या सूचना खासदर मेंढे यांनी कार्यकारी अभियंता शैलेशकुमार सिंग यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here