भाजपची अभिरुपविधानसभा भास्करराव जाधवांनी पाडली बंद…

न्यूज डेस्क – राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला. १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपानं सभागृहाबाहेर भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुरेश प्रभू यांनी सभागृहात आक्षेप घेतला. आमदारांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी कारवाई केली. मार्शलनी स्पीकर, माईक जप्त केले. त्यानंतर फडणवीसांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता पत्रकार कक्षात प्रतिसभा सुरू झाली आहे. 

भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर मलिक यांनी पाठिंबा देत काही विषय मांडले. अधिकार नसताना माजी आमदार यात कसे सहभागी होत आहे. काल झालेल्या गदारोळावेळी आम्ही मार्शलला बोलवलं, पण कुणीही आलं नाही.

या सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारावा, अशी मागणी मलिक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्पीकर वापरण्यासंदर्भात परवानगी दिलेली नाही. तसेच बाहेर जे बोललं जात आहे, तेही तपासून घेतलं जाईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. तसंच प्रतिविधानसभेत वाटल्या जाणारे कागद वाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही अध्यक्षांनी दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here