सेवा सप्ताहानिमित्त भाजप कार्यकर्त्यांकडून रुग्णालयांची स्वच्छता, फळे वाटप…

मनोर ग्रामीण रुग्णालय,मासवण, दुर्वेस आणि सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वच्छता.

मनोर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्य स्तरावर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सेवा साप्ताहाच्या निमित्ताने बुधवारी (ता.16)भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनोर ग्रामीण रुग्णालय, दुर्वेस,मासवण आणि सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्वछता केली.

तसेच रुग्णालयांत दाखल रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.स्वछता अभियान भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे, कोषाध्यक्ष सुमती जैन, मंडळ अध्यक्ष संतोषी गिंभल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुश्री पाटील,बबन वझे, किशोर खडके,अंजली कुडू,भारत काळे,प्रितम आंबेकर, अर्चना पाटील,तानाजी घोलप, प्रकाश जैन,हर्षद पाटील आणि भाजपचे कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here