भाजपा महिला आघाडी च्या वतीने अग्निशमन जवानांसोबत भाऊबीज साजरी…

सांगली – ज्योती मोरे

आज रोजी भाजपा महिला आघाडी मोर्चाच्या वतीने, स्वाती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष माधुरी वसगडेकर यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी केली.

खरंतर अग्निशमन दलाचे सर्वच जवान सगळ्याच आपत्कालीन परिस्थितीत आपल्या सोबत सदैव असतात. स्वतःचा परिवार, सणवार सोडून आपल्यासाठी २४ तास तत्पर असतात. या जवान बंधुंसोबत आज भाऊबीज साजरी करण्याचा मान मिळाला. त्यावेळी जवानांच्या चेहऱ्यावरचे आनंद, समाधान अवर्णनीय होते.

यावेळी श्री.विजय पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी.
श्री.सर्जेराव देसाई,उप अग्निशमन अधिकारी सांगली
श्री.सुनिल माळी, उप अग्निशमन अधिकारी मिरज
अग्निशमन दलाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ही भाऊबीज साजरी करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्या ज्योती ताई कांबळे, भाजपा शहर जिल्हा सचिव शोभाताई बिक्कङ अनुसूचित जाती मोर्चा सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष सविताताई कांबळे,भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग सांगली शहर संयोजिका दिव्या कुलकर्णी आणि पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here