एस.टी.कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा भाजप पाठपुरावा करणार – माजी आम.नितीन शिंदे…

सांगली – ज्योती मोरे

सांगली एस.टी. आगारातील सर्व कर्मचारी पहाटेपासून संपावर गेले आहेत. या संपा मधील कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे नेते माजी आम. नितीनराजे शिंदे यांनी* आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात भेट घेतली. त्यावेळी आंदोलकांशी बोलताना शिंदे म्हणाले महाराष्ट्रातील या महाआघाडी सरकारला एसटी महामंडळाचे खाजगीकरण करून एस टी महामंडळच्या करोडो रुपयांची संपत्ती हडप करायची आहे.

ही गोष्ट आम्ही कोणत्याही परिस्थितीत हाणून पाडू.एसटी महामंडळाचे आंध्र प्रदेशाच्या धरतीवर विलीनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी.या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी पाठपुरावा करणार.भाजपा प्रदेश कामगारआघाडी उपाध्यक्ष श्री अविनाश मोहिते म्हणाले, विलिनीकरणाची कामगारांची मागणी एस टी महामंडळ मधील निष्क्रिय कामगार संघटने मुळे व नाकर्त्या महाआघाडी सहकार मुळे रेंगाळली आहे.

जो पर्यंत एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासना मध्ये विलिनीकरण होत नाही. तो पर्यंत हा संप मिटवणार नाही. अशी ठाम भूमिका महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यावेळी बोलतांना नगरसेवक लक्ष्मण नवलाई म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्याना तुटपुंज्या पगारावर आपलं कुटुंब चालवणे, अतिशय अवघड गोष्ट आहे.

त्यांना ही शासकीय कर्मचारी म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. तो मिळालाच पाहिजे. यावेळी भाजपाचे आशिष साळुंखे, अजय काकडे यांच्यासह एसटीचे असं के कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here