भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चोप…शरद पवार यांच्यावर केली होती टीका…काय होती पोस्ट

फोटो -सौजन्य सोशल मिडिया

राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोपांची पातळी आता खालच्या स्तराला जात असल्याचे चित्र दिसत आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना पुणे शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिला. हा प्रकार आज सायंकाली पुण्यात घडला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाल्याचे दिसून आले होते.

विनायक आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर शरद पवार यांच्या विरोधात पोस्ट केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना हिसका दाखवला. तत्पुर्वी आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.

विनायक आंबेकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शरद पोस्ट केली होती. त्यांच्या फेसबूक वाॅलवर अंगविक्षेप आणि विचार यासंबंधित पोस्टमध्ये मजकूर होता. याच पोस्टवरुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर त्यांनी विनायक आंबेकर यांचे कार्यालय गाठून त्यांना चोप दिला.

विनायक आंबेकर यांनी अजून एक पोस्ट फेसबूकवर टाकलेली आहे. हि कवितेची पोस्ट असून त्यात त्यांच्या शेवटच्या ओळीतही शरद पवारांवर टीका केल्याचे दिसून येते.

कवितेतील ओळीवरुन माफीही मागितली होती

”माझ्या कवीतेत शेवटच्या दोन ओळी चुकिच्या लिहिल्या गेल्या होत्या. त्या मागे कोणताही वाईट हेतू नव्हता तरिही त्या मुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत असे माझे नेते गिरिश बापट यानी कळवल्या मुळे त्या मागे घेत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here