BJP च्या वतीने चीन विरुदध जोरदार निदर्शने व चीनी मालाची होळी…

राजू कापसे शितलवाडी(रामटेक)-

आज रामटेक शहराला लागूनच असलेल्या शितलवाडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक (टिपाईंटवर) येथे सकाळी 10 वाजता भारतीय जनता पक्ष व स्वदेशी जागरण मंचाच्या वतीने चीनवीरुदध जोरदार घोषणा व चीनीमालाची जाळपोळ करण्यात आली.दोनदिवसापुर्वी लद्दाखच्या गलवान घाटि येथे चीनी सैनीकांनी भारतीय सैनीकांवर हल्ला केला होता. त्यात भारतीय 20 जवान शहीद झाले.

भारतीय सैनीकांनीही चीनचे 40 पेक्षा जास्त सैनीक ठार केले.चीनची नेहमीच पाठीत खंजीर खुपसायची सवय झाली आहे.या हल्ल्याची संपूर्ण देशभर संत्पत प्रतीक्रिया ऊमटली आहे.संपूर्ण देशात तिव्र प्रतीक्रिया उमटत आहे.आज ती संत्पत प्रतिक्रिया भाजप व स्वदेशी जागरण मंचाच्या वतीने रामटेक तालुक्यातील पदाधिकारीकडून बघायला मीळाली.

सुरवातीला घोषणाबाजी, चीनी मालाची होळी व नंतर शहिद सैनीकांसाठी मौनव्रत ठेवून श्रद्धांजली देण्यात आली.यात भाजप तालुका अध्यक्ष नरेंद्र बंदाटे,भाजप जील्हा कार्यकारीणी सदस्य अनील कोल्हे,वीशाल कामदार, तालुका महीला आघाडी सदस्य अनीता दियेवार, तालुका महामंत्री राजेश जायस्वाल,

चरणसीगं यादव,नंदकिशोर कोहळे,ग्रामपंचायत सदस्य आशीष भोगे,भाजपचे शुसीला ,धमगाये, अर्चना बनगैया,वीजय लीलोरे,धंनजय तरारे,रमेश तेलोते, ओमकेश सावरकर,सुधाकर लेंडे, स्वदेशी जागरण मंचाच्या वतीने जंयत देशपांडे, ईश्वर साखरवाडे,संदिपकुमार उरकुडे व ईत्यादी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here