भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा कोविड च्या अपयशा संदर्भात सरकारला घरचा आहेर…

भाजपाचे राज्यसभेचे खासदार माजी केंद्रीय मंत्री तसेच प्रसिद्ध अर्थतज्ञ, प्रोफेसर, राजनितिक लेखक विद्वान सुब्रमण्यम स्वामी यांनी 3 मे 2021 रोजी ट्विट करून सरकारच्या कोरोना व्हायरस च्या अपयशा संदर्भात सरकारची कानउघडणी केली.

सुब्रमण्यम स्वामी यांनी असे म्हटले की शासनाने ओ 2 ऑक्सिजन किती उपलब्ध आहे हे सांगणे थांबवावे परंतु आम्हाला भारत सरकारने किती पुरवठा करण्यात आलेला आहे आणि कोणत्या रुग्णालयात केला हे सांगावे.

ऑक्टोबर २०२० पर्यंत आरोग्य व संसदेच्या स्थायी समितीने उत्पादन व पुरवठ्यात ओ २ ऑक्सिजन सिलिंडर्सची तीव्र टंचाई निर्माण होण्याचा इशारा दिला होता. परंतु सरकारने आरोग्य व संसदेच्या स्थायी समितीने केलेल्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष केले असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here