Wednesday, November 29, 2023
HomeMarathi News Todayसंसदेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदाराला केली शिवीगाळ…व्हिडीओ व्हायरल…

संसदेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदाराला केली शिवीगाळ…व्हिडीओ व्हायरल…

Spread the love

दिल्ली दक्षिणचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्यासाठी अपशब्द वापरले. चांद्रयान-3 वर बोलताना भाजप खासदाराने अत्यंत आक्षेपार्ह आणि असंसदीय शब्द वापरले. राजनाथ सिंह यांना रमेश बिधुरी यांच्याबद्दल खेद व्यक्त करावा लागला. ते म्हणाले की रमेश बिधुरी यांनी काही आक्षेपार्ह म्हटले असेल तर ते रेकॉर्डमधून काढून टाकावे आणि मी खेद व्यक्त करतो.

खरे तर काही विरोधी खासदारांनी पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 चे श्रेय देण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. रमेश बिधुरी सांगत होते की, देशात ज्या एम्स आणि इतर संस्था उभ्या राहिल्या आहेत त्या देशातील जनतेने बांधल्या आहेत, मग त्या सर्व एकाच कुटुंबाच्या नावावर का आहेत. तसंच चांद्रयानच्या यशाचं श्रेय मोदीजींना जात असेल तर तुमच्या पोटात दुखतंय का? दानिश अली अडवत असताना रमेश बिधुरी यांनी अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरले. तर यावेळी भाजपचे दिल्लीतील दुसरे खासदार हर्षवर्धन जोरजोरात हसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: