भाजपच्या नेत्या रश्मीताई कोटगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश…

नागपूर – शरद नागदेवे

हिंगणा – डिगडोह परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या माजी पंचायत समिती सदस्य रश्मीताई धनराज कोटगुले यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसामान्यांचा पक्ष असून गोरगरिबांना कष्टकरी कामगार वर्गाला न्याय देणारा पक्ष आहे. बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी मध्ये न्याय मिळतो त्यामुळे माझ्या परिसरातील माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकरिता लढण्यासाठी मी आज कार्यकर्त्यांची कदर न करणाऱ्या भाजप चा त्याग करून माजी मंत्री रमेशचंद्र बंग, व माजी आमदार विजय घोडमारे यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अश्या भावना पक्ष प्रवेशानंतर रश्मीताई कोटगुले यांनी व्यक्त केल्या.

प्रवेश करणाऱ्यांचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग,माजी आमदार विजय घोडमारे, जि.प. महिला बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, जिल्हापरिषद सदस्य दिनेश बंग, वाडी न.प. चे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडें, माजी सभापती बबनराव अव्हाळे, रेखाताई कळसकर यांनी पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देऊन पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजप नेत्या माजी पंचायत समिती सदस्या रश्मीताई कोटगुले, प्रदीप कोटगुले,

सुधाकर रडके, डिगडोह ग्रामपंचायत सदस्य राहुल पांडे, मंगलाताई दामोधर रडके, हर्षलताताई गौतम मेश्राम, बबन पडोळे, रविकार चतुर्वेदी, नरेश कोटगुले, पंकज अंबादे,उकंडे गुरुजी,लक्की सिंग, राजेश माहुरे, रितेश कोल्हे, गोपाळ रडके, राहुल रडके, सुनील गोंड, मोनाताई पाईकराय, रंजन कुमार,

सोनू उईके,रेवतीताई बावणकर, अनिल डोंगरे, लखन सिंग, किशोर झाडें, नझीम बेग, अभिषेक शेंडे, दीपक रडके, हर्षल कांबळे, योगेश मोहुर्ले, निलेश मोहुर्ले, शक्ती भांगे, अमर भांगे आदी सह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यावेळी राकापा तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, प.स. सदस्य सुनील बोंदाडे,आकाश रंगारी,विठ्ठल कोहाड,रमेशसिहं राजपूत,राजाराम पांडे, सुशील दीक्षित, गोवर्धन प्रधान, पुरुषोत्तम डाखळे,प्रमोद बंग,राजू हाडपे,नगरसेवक नारायण डाखळे,राजा तिवारी,युवा राकापा तालुकाध्यक्ष आशिष पुंड, कार्याध्यक्ष नाना शिंगारे,

काँग्रेस पक्षाचे शशिकांत थोटे,गुणवंता चामाटे, संतोष चौहान, निखिल मसाराम,लीलाधर दाभे,मंगेश भांगे,डॉ अल्लेवार,बी.एन.सिंग,भवानी शर्मा,युवराज पुंड,विजय मेश्राम,आदी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here