पातूर शहरामध्ये कोरोना लसीकरण केंद्र संख्या वाढविण्यात यावी भाजयुमो शहर अध्यक्ष सचिन बारोकार यांची मागणी…

देशामध्ये दिवसेनदिवस कोरोना विषाणुचा पार्दुभाव वाढत असल्यामुळे या कोरोनाला आळा घालण्यासाठी नुकतेच केंद्र शासन,महाराष्ट्र शासनाने १८ वर्षावरिल लस देण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पातूर शहरामध्ये नगर परिषद शाळा कं. १ या लसिकरण केंद्रामधुन सध्या लसिकरणास सुरुवात झालेली आहे.

परंतु पातूर शहराची व आजूबाजूच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या पाहता नुसते एक लसिकरण केंद्र देण्यात आले आहे. वास्तविक पाहता शहराची एवढी भली मोठी लोकसंख्या पाहता लसिकरण केंद्र मात्र एकच या एकाच लसिकरण केंद्रावर लोकांची गर्दी होण्याचा धोका होत असून त्यातून कोरोना विषाणुचा पार्दुभाव वाढण्यास मोठया प्रमाणावर परिणाम होईल व उपस्थित असलेल्या लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करीता शहरामध्ये पुन्हा एक लसिकरण केंद्र नगर परिषद शाळा कं. २ किंवा नगर परिषद जुने सभागृह या दोन केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र देण्यात यावे जेणेकरून लोकांची गर्दी होण्यास आळा बसेल व कोरोना या विषाणुचा पार्दुभाव रोखण्यासाठी मदत होईल व कोरोना जास्त प्रमाणात पसरणार नाही.

व शहरातील लोकांचे आरोग्य सुरक्षीत राहील.शहरामध्ये आणखी दुसरे लसिकरण केंद्र नगर परिषद शाळा कं. २ किंवा नगर परिषद जुने सभागृह मध्ये सुरू करण्यात यावे जेणेकरून शहरातील सर्व लोकानां लस मिळेल तसेच जेवढ्या लसी उपलब्ध आहेत तेवढेच सुरुवातीला आधार कार्ड घेऊन कुपण देण्यात यावे म्हणजे नागरिकांना ताटकळत बसावे लागणार नाही व 18 ते 44 साठी एक लसीकरण केंद्र व 44 वर्ष वरील नागरिकांसाठी एक लसीकरण केंद्राचे नियोजन करण्यात यावे पातूर शहरात असे नियोजन केल्यामुळे या महाभंयकर कोरोना प्रादुर्भातून लोकांची सुटका होईल.

अशी मागणी पातूर तालूका आरोग्य अधिकारी व तहसीलदार पातूर याना पातूर भाजयुमो पदाधिकारी यांनी निवेदनामार्फत केली आहे
या वेळी भाजयुमो चे शहर अध्यक्ष सचिन बारोकार,आशुतोष सपकाळ,भारत फुलारी,अक्षय कवले, दिनेश करपे,निलेश फुलारी,धीरज बंड, नितीन खंडारे,निरज कुटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here