सांगली – ज्योती मोरे
आज दिनांक 11-2-2022 रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक महा सचिव, अंतोदय, एकात्म मानववाद संकल्पनेचे जनक, कुशल संघटक, कै.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. दीपक बाबा शिंदे यांनी भाजपा सांगली शहर जिल्हा कार्यालय व आम.सुधीर दादा गाडगीळ यांचे संपर्क कार्यालय विश्रामबाग येथे पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी मा. दीपक बाबा शिंदे म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यासाठी व भारतीय जनसंघाच्या संघटन करिता अर्पित केले. संपूर्ण देशाला एकात्म मानववादाचा संदेश देऊन, देशातील नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, व्यक्ती से परिवार, परिवार से राष्ट्र,या भावनेचे संदेश दिला. त्यांचे अकाली निधन ही एक शंकास्पद घटना घडली गेली. पंडित यांचे विचार आजही राष्ट्रासाठी प्रेरक ठरले आहेत.

या प्रसंगी भाजपा प्रदेश मा.उपाध्यक्ष निताताई केळकर, ज्येष्ठ भाजपा नेते प्रकाशतात्या बिरजे,संघटन सरचिटणीस दीपक माने, सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. भालचंद्र साठे, नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेविका सौ कल्पना कोळेकर, कुपवाड मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते, प्रदेश महिला सदस्य ज्योतीताई कांबळे,
प्रीती काळे,भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष उदय मुळे, व्यापार आघाडी उपाध्यक्ष रवींद्र वादवणे, अमोल कणसे, गणपतराव साळुंखे,राजू आवटी, निलेश हिंगमिरे, संजय जोशी, गौस पठान, आबा जाधव, आदी उपस्थित होते