रावेर तालुक्यातील आदिवासी भागात काँग्रेस भाजप व इतर काही संघटनेच्या शेकडो कार्यकर्ते यांनी केला प्रहार जनशक्ती पक्षात केला प्रवेश…

रावेर – उमाकांत मराठे

दि.०८ नोव्हे आज राज्य मंत्री बच्चु कडू यांचा प्रहार पक्षात रावेर तालुक्यातील लोहारा ह्या आदिवासी भागात पण महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या कार्यावर विश्वास ठेवत अनेक भाजप व काँग्रेज कार्यकर्ते यांनी पक्ष प्रवेश केला बच्चु कडु यांचे सर्वात आधी शेतकरी,मजूर,दिव्यांग, विधवा व गोरगरीब जनतेचे कैवारी तसेच भ्रष्ट व कामचुकार अधिकाऱ्यांचे कर्दनकाळ राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन तसेच पक्षाचे उ.म.अध्यक्ष, अनिल भाऊ चौधरी.

जळगांव जिल्हाध्यक्ष अविनाश जी पाटील यांच्या वर विश्वास ठेवत आज लोहारा येथील काँग्रेस व भाजप च्या कट्टर समर्थक असलेल्या शेकडो तरुणांनी प्रहार युवा जिल्हा प्रमुख अविनाश भाऊ पाटील,रावेर ता.प्रमुख पिंटू भाऊ धांडे,रावेर ता.युवा प्रमुख योगेश भाऊ निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोहारा येथील मज्जिद भाऊ तडवी व सुनील भाऊ पवार यांच्या पुढाकाराने प्रहार मध्ये जाहीर प्रवेश केला.

सर्वप्रथम ता.युवा प्रमुख योगेश भाऊ निकम यांनी बच्चू भाऊंचा जीवनप्रवास सांगितला तर युवा जिल्हा प्रमुख अविनाश भाऊ पाटील यांनी पक्षाचे ध्येय,धोरण व काम करण्याची पध्दत याबद्दल माहीती दिली या प्रसंगी प्रहार चे अहमद भाई तडवी,राजू भाऊ पाटील आणि तय्यूब भाऊ तडवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here