बुलढाण्यात भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक आपसात भिडले…

न्यूज डेस्क – बुलढाण्यात भाजप आणि शिवसैनिक आपसात जोरदार राडा केल्याची माहिती समोर आली असून आज बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद पेटला आहे.

बुलडाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढवला.

शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपा कार्यकर्ते आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्याच्या तयारीने आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात झटापट झाली. भाजप पदाधिकारी शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटाना शांत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here