कामरगाव जवळ लक्झरी बस आणि मोटरसायकलचा विचित्र अपघात…अपघातात २ ठार…

कामरगांव-औरंगाबाद वरून नागपूरकड़ जाणाऱ्या खाजगी ट्रैवल्स बस मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने पलटी होऊन त्याखाली दबुन एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्यामागून येणारी दुचाकीही त्याच मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरल्याने घडलेल्या अपघातात आणखी एक जण जागीच ठार झाल्याची घटना.

29 सप्टेंबर रोजी सकाळी साडे 3 ते 4 वाजताच्या दरम्यान कारंजा अमरावती मार्गावरील टाकळी फाट्यानजीक घडली. प्राप्त माहितीनुसार, एम एच 28 ई एल 4100 क्रमांकाची लक्झरी औरंगाबाद वरून नागपूरकडे जात असतांना मार्गातील टाकळी फाट्यानजीक रस्त्याच्या मधोमध कंत्राटदाराने टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून बस घसरली. व रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

यात अमोल जोगेश खंडारे वय 21 वर्ष रा. नागपूर हा लक्झरीखाली दबल्याने जागीच ठार झाला तर चेतना रमेश भगत , प्रशांत चैनलाल काळे, संदिप विनोद टेकाम, सीमा नितीन गवई व चेतना नितीन गवई असे पाचजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर काही क्षणातच एम एच 27 ए टी 5703 क्रमांकाची दुचाकी याच मार्गाने याच ठिकाणी आली असता त्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली.

व दुचाकीवरील मागे बसलेल्या प्रभाकर चंद्रभान वाघ वय 50 वर्ष रा. शेंदुरजुना खु. ता. धामनगाव यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. या दुचाकीवरील दोघेजण पंढरपूरहून अमरावतीकडे जात होते. मागील काही दिवसांपासून कारंजा अमरावती मार्गाच्या रूंदीकरणाचे व काॅंक्रिटीकरणाचे काम हैदराबाद येथील आर आर कन्स्ट्रक्शनच्या वतीने सुरू आहे.

हे काम करतांना संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा टाकल्याने उपरोक्त दोन्ही अपघात घडले आहे. तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचनाफलक लावण्यात आले नाही. यापूर्वी देखील याच मार्गावर कंत्राटदाराच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत चार जणांचा बळी गेला आहे. एकीकडे रस्तेविकास महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी रस्ते बनविले जात आहे.

तर दुसरीकडे याच रस्त्यासाठी कंत्राटदाराच्या चुकीमुळे सर्वसामान्यांचा बळी दिल्या जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच धनज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेची पोलीसात नोंद घेतली. व जखमींना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव गा्रमीण रूग्णालयात दाखल केले. घटनेचा अधिक तपास धनज पो स्टे चे ठाणेदार अनील ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कपिल मसके,स.पो.उपनिरीक्षक गजानन कदम,जमादार राजगुरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here