सौं मोनाली गावंडे आणि मनीष शिवणकर यांची प्रमुख उपस्थिती.
सौं जया टाले यांचा ही वाढदिवस संपन्न.
मुर्तीजापुर – आज 12 जानेवारी रोजी प्रकाशवाट ग्रंथालय येथे हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा मोडून धर्माला विधायक स्वरूपाचे अधिष्ठान प्राप्त करुन देणारे स्वामी विवेकानंद आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्षा सौं मोनाली गावंडे, महाराज मनीष शिवणकर, कमलाकर गावंडे, रामकृष्ण गावंडे, सौं जया टाले आणि योगा प्रशिक्षक जितेंद्र हासानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सर्वात प्रथम शिवणकर महाराज यांच्या मंत्राचा गजारात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रकाशवाट प्रकल्प टीम कडून पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले. या प्रसंगी शिवणकर महाराज यांनी मनोगतात ग्रंथालय आणि योगा अभ्यासाकरिता प्रकाशवाट प्रकल्प टीम चे कौतुक केले. आणि अश्या उपक्रमामुळे खऱ्या अर्थाने युवकला चालना मीळेल असे उदगार काढले.

खूप दिवसापासून प्रकल्पला भेट देण्याची इचछा होती पण आज योग जुळून आला त्यानिमित्ताने त्यांनी ग्रंथालय ला 7000 रुपये ची भेट नगदी स्वरूपात कार्यक्रमात बाम्बल सर कडे सुपूर्द केली. तसेच आज दुग्ध शरकरा योग म्हणजे प्रकाशवाट चे आधारस्तंभ मा ज्ञानेश टाले यांच्या पत्नी सौं जया टाले यांचा ही वाढदिवस, तो ही कार्यक्रम स्थळी साजरा करण्यात आला. नागराध्यक्षा मोनाली गावंडे यांनी त्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केले.
या प्रसंगी त्यांनी ग्रंथालय ला स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट म्हणून दिली तसेच योगा अभ्यासाकरिता मॅटिंन भेट दिली. सोबतच हकीमी हार्डवेरचे संचालक जाफरभाई सैफि यांनी 50 फूट रबरी पाईप ग्रंथालय ला भेट दिला. कार्यक्रमाला योगा अभ्यासाकरिता उपस्थिती राहणारे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमकरिता प्रकाशवाटप्रकल्प टीम नागपूर व मूर्तिजापूर यांनी परिश्रम घेतले.