गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एका आरोग्य कर्मचाऱ्यास बिलोली ग्रामीण रुग्णालयात अटक…

फोटो -सौजन्य गुगल

नांदेड
रत्नाकर जाधव

देशी बनावटीच्या पिस्टलसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास बिलोलीच्या रुग्णालयातुन पोलिसांनी अटक केली.आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. जिल्हयामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व पोलीस निरीक्षकांना विशेष सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार वजिराबाद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना नियमीतपणे अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करत असताना गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक १९ जानेवारी रोजी गोवर्धनघाट परीसरामध्ये एक जण गावठी पिस्टल दाखवून नागरिकांना धमकावित होता.

सदर माहितीवरून पो.नि.जगदीश भंडरवार, यांनी गुन्हे शोध पथकाचे स.पो.नि.संजय निलपत्रेवार,अंमलदार दत्तराम जाधव,विजयकुमार नंदे,मनोज परदेशी,गजानन किडे,शरदचंद्र चावरे, पो.कॉ.संतोष बेलुरोड,व्यंकट गंगुलवार,शेख ईमान यांना नमुद गुन्हेगारा बाबतची माहीती काढुन योग्यती कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

सदर सुचनेप्रमाणे काल दिनांक २४ जानेवारी रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पिस्टल बाळगणाऱ्या गुन्हेगाराचे नांव निष्पन्न करून त्यास ग्रामीण रुग्णालय बिलोली येथुन ताब्यात घेतले.त्यास पिस्टल बाबत विचारणा केली असता तो उडवा – उडवीची उत्तरे देऊ लागला.त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी एक देशी पिस्टल नांदेड येथे असल्याचे कळवून ती पंचासमक्ष काढुन दिल्याने ती जप्त केली आहे.

सदर प्रकरणी पोहेकॉ दत्तराम जाधव यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि संजय निलपत्रेवार हे करीत असुन आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here