बिलोली नगरपरिषदेच्या सौरऊर्जा बाबतीत सभेत चर्चाच झाली नाही – ओमप्रकाश गौंड…

बिलोली – रत्नाकर जाधव

बिलोली नगरपरिषदेच्या वैशिष्ट्य पूर्ण योजनेच्या निधीतून सौरऊर्जा खरेदीचा विषय सभेत ठेवला होता परंतु त्यावर सभेत चर्चा झालीच नाही असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी दिली आहे.

बिलोली नगरपरिषदच्या २०१९ चा वैशिष्टय पूर्ण योजनेच्या निधीतून शहरात सौरऊर्जा दिवे बसविण्या- साठी विशेष सभेत घेतला असल्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला असल्याचा आरोप करत सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्याकडे तक्रार करून त्याला मंजुरी देऊ नये असे निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यधिकारी यांना दिले.त्या अनुषंगाने मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी नगर- परिषदेच्या विशेष सभेत हा विषय ठेवण्यात आला होता.परंतु या विषयी सभेत चर्चा झाली नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here