बिग बॉस 15 च्या विजेत्याचे नाव जाहीर झाल असून या रिअलिटी शोची विजेती टीव्हीची बबली आणि सुंदर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बनली आहे. बिग बॉस 15 मध्ये, तेजस्वी प्रकाशसह करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांनी पहिल्या तीनमध्ये प्रवेश केला. पण तेजस्वीने दोघांचाही पराभव करत सीझन 15 ची ट्रॉफी ताब्यात घेतली. तेजस्वी प्रकाशची थेट स्पर्धा प्रतीक सहजपाल यांच्याशी होती. तेजस्वी आणि प्रतीकने टॉप 2 मध्ये प्रवेश केला. मात्र मतांच्या कमतरतेमुळे प्रतीकला शो गमवावा लागला. प्रतीक हा या शोचा फर्स्ट रनर अप ठरला आहे.
ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने दोन फायनलिस्टचा हात धरला आणि विजेत्याचे नाव घेतले. चाहते तेजस्वीचे विजयासाठी अभिनंदन करीत आहेत. तेजस्वी प्रकाश यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासह त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या.
तेजस्वी प्रकाशला अभियंता व्हायचे होते
तेजस्वी प्रकाश यांचा जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला. त्यांचे वडील प्रकाश वायंगणकर आणि भाऊ प्रतिक वायंगणकर हे इंजिनिअर आहेत. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण करून तीही इंजिनीअरिंगच्या लाईनमध्ये आली. तिला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचं होतं आणि कालांतराने तीही इंजिनियर झाली. त्यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पण काही काळानंतर अभिनेत्रीने आपले करिअर बदलण्याचा निर्णय घेतला.
अभिनेत्रीने या टीव्ही शोमध्ये काम केले
तेजस्वी प्रकाशने अभियांत्रिकीची पदवी घेण्यासोबतच अभिनय विश्वात प्रवेश केला होता. जेव्हा ती टीव्हीवर दिसली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तेजस्वीची पहिली मालिका ‘2612’ आहे, जी 2012 मध्ये प्रसारित झाली होती. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात ‘स्वरागिनी-जोडे रिश्ते का सूर’, ‘पेहेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे.