मोठी बातमी | सदाभाऊ आणि पडळकरांचा एसटी आंदोलनातून काढता पाय…कामगार आपल्या निर्णयावर ठाम…

न्यूज डेस्क – मुंबईतील आझाद मैदावर सुरु असलेल्या राज्यातील एसटी कामगारांचं आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी माघार घेतली असून सर्वकाही कामगार निर्णय घेतील असल्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी केली, मात्र कामगार आंदोलनावर ठाम असून आंदोलन सुरूच राहणार आहे. जो पर्यंत शासकीय विलीनीकरण होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी एसटी कामगारांची भूमिका आहे. एसटी कामगार हे गेल्या १५ दिवसांपासून आंदोलनास बसले होते.

काल रात्री एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परबांनी यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१% मोठी वाढ सोबतच विलीनीकरणासाठी समितीचा जो ही निर्णय येईल तो राज्य सरकार मान्य असल्याचे यांनी सांगितले होते,तो यानंतर एसटी कामगारांच्या वतीने पत्रकार परिषदेत सहभागी झालेल्या सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी कामगारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

पत्रकार परिषद संपल्यानंतर आंदोलन स्थळी गेले असता तेथे त्यांनी आम्ही रात्रभर विचर करून उद्या सकाळीच निर्णय घेण्याचे सांगितले होते. तर आता एस.टी. कर्मचारी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये फूट पडलेली स्पष्ट दिसते आहे. कारण भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असही खोत, पडळकर म्हणालेत.

“हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो. 15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला टप्पा आहे. 17 हजार पगार मिळणाऱ्या कामगारांना 24 हजारांवर गेला आहे. ज्या कामगारांना 23 हजार मिळत होता त्यांना 28 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे”, असं खोत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here