मोठी बातमी | जर बँक बुडाली तर ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार एवढी रक्कम…अर्थमंत्र्यांची माहिती

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही पत्रकार परिषदेत हजेरी लावली.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आर्थिक वर्ष 21 मधील भारताच्या वाढीचा अंदाज तीन टक्क्यांनी कमी करून 9.5 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका दिवसानंतर सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी आयएमएफचा अंदाज 12.5 टक्के होता.

डीआयसीजीसी बिल- बँक ग्राहकांचे हित लक्षात घेता ठेवी विमा आणि पत हमी निगम कायदा (DICGC) दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. याद्वारे बंद बँकांच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता बँक बुडल्यास 90 दिवसांच्या आत ठेवीदारांना पाच लाख रुपये मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here