मोठी बातमी | राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता…पहिल्या टप्प्यात होणार २०८८ प्राध्यापकांची भरती…

फोटो सौजन्य गुगल

न्यूज डेस्क – राज्यातील प्रलंबित असलेल्या प्राध्यापक भरती प्रकियेला राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिलीय. प्राध्यापक भरती प्रक्रिया हि लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. राज्यात पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली.

उदय सामंत यांनी राज्यात प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे म्हटले. सामंत यांनी सांगितल्यानुसार प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता मिळालेली आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मागील अनेक महिन्यांपासून राज्यात प्राध्यापक भरती करण्यासाठी आंदोलन करण्यात येत होते. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. 100 टक्के पदभरती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. राज्य सरकारच्या वतीनं त्यावेळी प्राध्यापक भरतीच्या पहिल्या टप्प्याला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. वित्त विभागाकडे फाईल पाठवणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं, मात्र अद्याप या कोणताही कारवाई करण्यात आली नव्हती. आता मात्र ही भरती प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here