देगलूर पोटनिवडणुकीमध्ये भाजपला मोठा झटका…काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय…

फोटो- सौजन्य गुगल

देगलूरमध्ये विधानसभा पोटनिवडणुकी मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपाला झटका देत विजय मिळविला. पंढरपूर जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला चांगलाच झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेसनं ही पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. तर भाजपकडूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.

उमेदवार निहाय मिळालेली मतं
जितेश अंतापूरकर – 1 लाख 8 हजार 789
सुभाष साबणे – 66 हजार 872
उत्तम इंगोले – 11 हजार 347
विवेक सोनकांबळे – 465

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here