मोखाडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी बसलेल्या उपोषणास भूमीसेना, आदिवासी एकता परिषद चा जाहिर पाठिंबा…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

मोखाडा तालुक्यातील भीषण पाणी टंचाई व अपूर्ण नळ पाणी योजना क्रित्येक वर्षापासुन पूर्ण केली जात नाही त्या विरोधात मोखाडा येथील सदस्य तथा माजी सभापती प्रदीप माधव वाघ हे दिनांक ०३ सप्टेबर २०२० पासुन बेमुदत उपोषणास बसले आहेत सदर पाणी टंचाई बाबत पंचायत समिती मोखाडा व जिल्हा परिषद पालघर सभागुहात अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी व विषय घेऊन सुध्दा कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्या मुळे,

पालघर जिल्हात विकासाच्या नावाखाली बुलेट ट्रेन, वाढवण बंदर , एक्सप्रेस वे , इत्यादि विनासहकारी प्रकल्प लादून येथील आदिवासी व भूमीपुत्राना उध्वस्त केले जात आहे असे सवॆञ बोलले जात आहे.देशाच्या सवाॆगींन विकासात आमची कुठलीही आडकाठी नाही,तर दुसरीकडे सर्व सामान्याचा मूलभूत सुविधा देखील पुर्ण केल्या जात नाही. मोखाडा तालुक्यासारख्या “दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था केली जात नाही हि शरमेची गोष्ट असल्याची सवॆञ चचाॆ आहे.

या सदंर्भात सदस्य तथा माजी सभापती प्रदीप माधव वाघ हे दिनांक ०३ सप्टेबर २०२० पासुन मोखाडा येथे बेमुदत उपोषणास बसले असुन सदर उपोषणास भूमीसेना आदिवासी एकता परिषद चे पदाधिकारी कार्यकतेॆ दत्ता सांबरे , भास्कर दळवी , शशी सोनावणे , मगन पाटील , जयराम मिसाल , वंदना जाधव , कविता उमतोल , यांनी प्रत्यक्ष उपोषणाच्या ठिकाणी मोखाडा येथे भेट घेऊन सक्रिय पाठींबा जाहीर केला व सदर उपोषणाबाबत भूमीसेना आदिवासी एकता परिषद तर्फे सदर पाणी पुरवठा योजना.

लवकरात लवकर पुर्ण करावी व सदर कामाबाबत दिरंगाई करणार्या सबंधित अधिकार-याॆंन वर त्वरित कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भूमीसेना आदिवासी एकता परिषद यानी जिल्हाधिकारी पालघर व पंचायत समिती मोखाडा यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे .असे प्रतिपादन प्रकाश जाधव , कार्यकत्येभूमीसेना , आदिवासी एकता परिषद यांनी आमच्या प्रतिनिधीनीसी बोलतांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here