आमदार आशिष जयस्वाल यांचे हस्ते ग्राम पंचायत देवलापार येथिल विविध विकास कामांचे भुमिपूजन संपन्न…

देवलापार -पुरुषोत्तम डडमल

सोमवार दि.२ऑगस्ट रोजी ग्रा.पं.देवलापार येथे नागरी सुविधा,जन सुविधा,दलित वस्ती योजना अंतर्गत विविध विकास कामांचे भुमिपूजन आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे,जि.प.सदस्या शांताताई कुंभरे,पं.स.उपसभापती रविंद्र कुंभरे,पं.स.सदस्य संजय नेवारे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विवेक तुरक,शिवसेना उप तालुका प्रमुख देवानंद वंजारी,माजी जि.प.सदस्य कैलास राऊत,पं.स.सदस्य चंद्रकांत कोडवते,सरपंच शाहिस्ता पठान,उपसरपंच विनोद मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.

या कामामध्ये देवलापार वार्ड क्र.४ मध्ये शञुघन राऊत ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंत भुमिगत नाली बांधकाम रु.५ लक्ष,पारस किराणा ते मोसिल पठान यांच्या घरार्यंत सिमेंट रस्ता रु.१० लक्ष,साबिर अलि ते राजु रहाटे घरापर्यंत भुमिगत नाली रु.५ लक्ष,हैदर शेख ते दिलीप शंभरकर यांच्या घरापर्यंत भुमिगत नाली रु.२.५ लक्ष,नितीन नागोते ते संजय गुप्ता घरापर्यंत भुमिगत नाली रु.५ लक्ष,

नत्थु कोवाचे ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंत भुमिगत नाली रु.१० लक्ष,रामनगर येथे नालीवर झाकण रु.२ लक्ष,वार्ड क्र.३ मध्ये कमलाबाई जयस्वाल ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंत भुमिगत नाली रु.३ लक्ष,निमटोला येथे शकुंतला कोडापे ते विनोद मडावी घरार्यंत भुमिगत नाली रु.१० लक्ष,झिंझेरीया येथे समाजभवन दुरुस्ती रु.१ लक्ष,झिंझेरिया येथे बागकाम रु.५ लक्ष अशा विविध विकासकामांचे भुमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच शेखर खंडाते,विनाताई ढोरे,क्रिती आहाके,हिरामण मरसकोल्हे,इंद्रजित वलोकर,प्रमोद गुप्ता,एकनाथ गोडबोले,मुकेश दुबे,शिवा कोडवते,ढोरे,ग्रा.पं.सचिव,सदस्य,ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here