मनपा कडून उभारल्या जाणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे १८ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतर्फे सांगली तील वारणाली परिसरात उभारण्यात येणाऱ्या कुपवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे भूमिपूजन 18 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे पालक मंत्री जयंतराव पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम, यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाच्या नियोजनाची पाहणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, नगरसेवक विष्णू माने, उपायुक्त राहुल रोकडे, चंद्रकांत आडके यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून हे हॉस्पिटल उभारणीसाठी मनपा प्रशासन जोरदार प्रयत्न करत आहे सध्या या ठिकाणी मुरमीकरण, फाउंडेशन यासारखे काम युद्धपातळीवर सुरू असून सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहन नगरसेवक विष्णू माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here