मनपा कडून उभारल्या जाणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे १८ ऑक्टोबर रोजी जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन – महापौर दिग्विजय सूर्यवंशी…

सांगली – ज्योती मोरे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतर्फे सांगली तील वारणाली परिसरात उभारण्यात येणाऱ्या 50 बेडची क्षमता असलेल्या कुपवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे भूमिपूजन 18 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता, जिल्ह्याचे पालक मंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते,

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी व प्रभागाचे नगरसेवक विष्णू माने यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे अवाहनही महापौर सूर्यवंशी व नगरसेवक विष्णू माने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here