डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बांधकामाचे भूमिपूजन…

गोंदिया – अमरदिप बडगे

तिरोडा तालुक्यातील ग्राम चिरेखनी येथे नालंदा बुद्धविहाराच्या शेजारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.

बाबासाहेबांच्या पुतळा बांधकामाचे भूमिपूजन गावातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक डॉ.मेखचंद शहारे, रामदास कोटांगले, वासुदेव शहारे, किशोर कोटांगले, तीर्थराज जांभूळकर, विष्णुदयाल जांभूळकर व नालंदा बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मनोज जांभूळकर, तसेच वयोवृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक वच्छला वालदे, चंद्रकला जांभूळकर, रसिका जांभूळकर व नालंदा बुद्धविहार महिला समितीचे अध्यक्ष पौर्णिमा शहारे यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आले. यावेळी सामूहिक त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच प्रसाद वितरित करण्यात आली.

यानंतर नालंदा बुद्धविहार समितीचे अध्यक्ष मनोज जांभूळकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. त्यात बांधकामाचे नियोजन, समजबांधवांचे योगदान आदि विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच समितीने ठरविलेले प्रती कुटुंब मासिक वर्गणी व पदाधिकार्‍यांचे उर्वरित शुल्क लवकर जमा करण्यास सांगण्यात आले. 

याप्रसंगी प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष देवानंद शहारे, नालंदा बुद्धविहार समितीचे सचिव सुभाष जांभूळकर, प्रतिष्ठित नागरिक नरेंद्र कोटांगले, शिक्षक शैलेन्द्र कोचे, उमेश जांभूळकर, महेंद्र कोटांगले, विशुपाल जांभूळकर, प्रवीण जांभूळकर, विनोद कोचे, शैलेन्द्र वालदे, किशोर सरोजकर, आशीष शहारे, दुर्गेश (बंटी) जांभूळकर, प्रदीप राऊत, महेश जांभूळकर, राजेश धमगाये, निशाल जांभूळकर,

कमलेश जांभूळकर, कुंदन भैसारे, कुणाल शहारे, निशा शहारे, पविता जांभूळकर, भारती भैसारे, पायल कोटांगले, वंदना कोटांगले, उज्ज्वला राऊत, रत्नमाला जांभूळकर, कृपाली सरोजकर, कमला शहारे, स्वानंदा कोटांगले आदि नालंदा बुद्धविहार समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व बौद्ध समाज बांधव-भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here