बोदवड च्या हिरव्या तलावाला पाडले भगदाड…कोट्यावधी लिटर पाणी वाया…

बोदवड प्रतिनिधी (गोपीचंद सुरवाडे ) बोदवड गावाला लागून असलेला सर्वात जुना तलाव जो हिरवा तलाव म्हणून ओळखला जातो, त्या तलावातील जलपर्णी वनस्पती व इतर विषारी वनस्पती केर कचरा काढून टाकनेसाठी चा ठेका नगर पंचायतीने दिला असता त्या ठेकेदाराने चक्क तलावाच्या भिंतीला भगदाड पाडून तलावाची भिंत फोडली यातून कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले,

या तलावाच्या आतील वनस्पती बाहेर काढण्यासाठी व भिंतीला भगदाड पाडणे साठी पोक लँन मशीनचा वापर करण्यात आला .यासाठी लघु सिंचन उप विभाग मुक्ताईनगर उपविभागीय अभियंता यांची परवानगी न घेता भिंत फोडण्यात आली आहे,बोदवड तालुक्यात विकासाच्या नावाखाली या अगोदर बोदवड पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग,कृषि विभाग,महसूल विभाग, महावितरण,जिल्हा परिषद बांधकाम विभाग,रोजगार हमी योजना ,ग्राम पंचायत, रोजगार हमी योजना ची कामे नियमबाह्य व बेकायदेशीर व पूर्व परवानगी न घेता करण्यात आली आहे.

ही कामे जनहित न पाहता स्वतःचे हित, ठेकेदाराचे हित आणि लोकप्रतिनिधींचे हित पाहून कामे केली जात आहे.२०१३–२०१४ मध्ये बोदवड मध्ये रोजगार हमी योजना च्या रस्ते कामासाठी शालिमार टॉकीज जवळची जीवंत पाण्याची विहीर बुजण्यात आली, नंदलाल पठे दक्ष पत्रकारा यांनीतत्कालीन तहसीलदार यांचे कडे तक्रार दाखल केली असता, तहसीलदार यांनी बोदवड पोलीस स्टेशन चे तत्कालीन पोलीस। निरीक्षक याना चौकशीचे आदेश दिले होते,

परन्तु या प्रकरणी पोलिसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणे पसंत केले .कुठे पाणी मुरले हे संबंधित विभाग जाणे. या बाबत लघु सिंचन उप विभाग मुक्ताईनगर उप अभियंता आर डी पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की याबाबत नगर पंचायत व संबंधित ठेकेदार यांचेवर कार्यवाहीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांचे कडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले,

नगर पंचायत भाजपाचीसत्ता आमदार सत्ताधारी पक्षाचे साधे नळ कनेक्शन घ्यायचे असेल तर नगर पंचायतीची नाहरकत घ्यावी लागते. ठेकेदाराने तर तलावाची भिंत फोडली,या नियम बाह्य कामाबत जिल्हा स्तरावरून काय कारवाई केली जाते हे काळच ठरवेल.नाहीतर सत्ताधारी विरोधकात मुंबई कल्याण च्या खेळासारखे कट शेम होऊ नये असे जनतेत म्हटले जात आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here