तुकोबांची बदनामी करणारे भावे चितळे…

चितळे नावाची कुणी एक बया आहे. तिने तिच्या वॉलवर advocate नितीन भावेची एक टुकार, बौद्धिक दिवाळखोरी आणि मानसिक विकृती दाखवणारी चंदू गोखले छाप कविता शेअर केलेली आहे. या ओळी खरडणाऱ्या भावेकडे पाहून आणि जणू काही पृथ्वी निक्षत्रिय झाल्याच्या आनंदात ती आपल्या वॉलवर शेअर करणाऱ्या चितळे नावाच्या बयेकडे पाहून या औलादी ब्र*देवाच्या ओकारीतून म्हणा किंवा जुलाबतून पैदा झालेल्या असाव्यात खास असे कुणाही विवेकबुद्धी शाबूत असणाऱ्या व्यक्तीला वाटल्या शिवाय राहणार नाही. त्याशिवाय अशी पहिल्या धारेची हरामखोरी प्रकट करणे शक्य नाही. शेवटी अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी | धरिताही परी आवरेना || विकृतीचा कंडू आवरतच नसेल तर त्याला भावे आणि चितळे तरी काय करणार?

या संपूर्ण ओळींमध्ये पवार द्वेष कसा आणि किती ठासून भरलेला आहे हे कुणाही सज्जन माणसाच्या चटकन लक्षात येईल. कविता लिहिणाऱ्याने आणि ती शेअर करणाऱ्या नालायक व्यक्तीने वेडाचे झटके आल्याबरहुकूम हा समग्र प्रकार केलेला दिसत आहे. पैकी एका व्यक्तीला बरेच झटके येत असल्याचे त्यांच्याच पोस्ट मधून समजले आहे. पण यावेळचा हा झटका अमळ जोरातच बसलाय म्हणायचा.

असो…. विकृतीची सनातनी परंपरा जोपासणाऱ्या क्षुद्र किड्याबद्दल काय बोलावे?

पण उपरोक्त लेखनात केवळ पवारांची बदनामी झालेली आहे असे मात्र नाही. कारण भावे नावाच्या चंदू गोखले छाप कवीने आपल्या टुकार काव्याची सुरुवातच ” तुका म्हणे ” अशा शब्दाने केलेली आहे. खरेतर तुका म्हणे हे केवळ दोन शब्द नाहीत तर ते इथल्या लाखो करोडो बहुजन समाजासाठी वेदांच्या रूचांपेक्षाही पवित्र असे शब्द आहेत. पवारांची बदनामी करताना या वैदिक भावेने खरेतर ” नितीन भावे म्हणे ” किंवा ” रामदास म्हणे ” अशा नाममुद्रेने सुरुवात करायला हवी होती. पण त्याने ती तशी न करता ” तुका म्हणे ” यांना नाममुद्रेने केली आहे. म्हणजे पवारांची बदनामी करणारे शब्द जणू तुकाराम महाराजच लिहित आहेत असे वाचणाऱ्यास वाटावे. ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची घोर विटंबना आहे. तुकोबांना आपल्या जीवाचे जीवन मानणाऱ्या करोडो वारकऱ्यांचा हा घोर अपमान आहे. रामदासाबद्दल लिहिताना आदरार्थी संबोधने वापरायची आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल किंवा समस्त बहुजन महापुरुष आणि संतांबद्दल लिहिताना मात्र त्यांचा अवमान होईल असे शब्द वापरायचे ही वैदिक सनातन विकृती आहे.

अशा विकृतीचा केवळ शाब्दिक निषेध करून ती मिटणार आहे काय? याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे.

@डॉ. बालाजी जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here