भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने भव्य पूरग्रस्त एल्गार संवाद मेळावा…

सांगली – ज्योती मोरे

पूरग्रस्तांना त्यांची योग्य ती नुकसान भरपाई मिळाली नाही तर, रस्त्यावर उतरावं लागेल.यातूनही न्याय मिळाला नाही तर, आगामी विधानमंडळाचं अधिवेशन चालू देणार नाही. पूरग्रस्तांना पै न पै मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे आणि मकरंद देशपांडे यांनी दिलाय. पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारनं सांगली शहरासह ग्रामीण भागातील पूरग्रस्त नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत देऊन थट्टा करण्याचं काम चालवलंय.
२०१९ सालच्या महापुरानंतर तत्कालीन फडणवीस भाजप सरकारनं पूरग्रस्त नागरिकांना घरटी १५ हजार रुपये आणि पूरग्रस्त व्यापाऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत तातडीनं दिलेली होती. परंतु २०२१ साली आलेल्या महापुरानंतर महाविकास आघाडी सरकारनं, पूरग्रस्त नागरिकांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ सर्व पूरग्रस्त भागातील नागरिक,व्यापारी आणि छोटे मोठे व्यावसायिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पूरग्रस्त एल्गार संवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे,मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी,

नगरसेवक युवराज बावडेकर, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सुब्राव मद्रासी, विनायक सिंहासने, नगरसेविका स्वाती शिंदे, महिला आणि बालकल्याण सभापती गीतांजलि ढोपे पाटील, नगरसेविका सविता मदने, आदी मान्यवरांसह सांगली आणि परिसरातील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here