लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न साठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा…आमदार अमोल मिटकरी

संभाजी बिडीवर त्वरित बंदी आणावी…देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाड्याला आंतरराष्ट्रीय स्मारक घोषित करावे…आमदार अमोल मिटकरी

कुशल भगत

आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या संदर्भात विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधले असून याद्वारे अकोला येथे पोलीस आयुक्तालय निर्माण होणे महत्त्वाचा विषय असून कोविद च्या पार्श्वभूमीवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

तसेच नाफेड अंतर्गत झालेल्या तूर व हरभरा खरीदी चुकारे लवकर शेतकऱ्यांना मिळावे व अकोला जिल्ह्यातील दुर्गम भागातील व अनेक जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केल्या जावेत तसेच कुटासा येथील 89 हेक्‍टरवरील बंगाली काट्यांनी वेढलेले जंगल काढून तेथे इको टुरिझम साठी प्रयत्न केला जावा व यासह विविध विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधले,

आमदार अमोल मिटकरी हे विधानसभा सदस्यांमधून नवनियुक्त झाले असून त्यांचे हे पहिलेच अधिवेशन होते या अधिवेशनात त्यांनी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here