भंते नागघोष यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अग्नी संस्कार संपन्न…

नागपूर – शरद नागदेवे

जागतिक कीर्तीचे भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या निकटचे महास्थवीर भदंत नागघोष यांच्यावर आज कन्हान येथील हरदास घाटावर शेकडो भिक्षु व हजारो उपासकांच्या उपस्थितीत अग्निसंस्कार करण्यात आला.

भन्ते नागघोष यांचे काल वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. आज सकाळी नऊ वाजता इंदोरा बुद्ध विहारातून त्यांची अंतिम यात्रा निघाली. इंदोरा येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भन्ते ससाई यांच्या हस्ते माल्यार्पण झाल्यावर कामठी रोड ने बुद्धम् शरणम् असा जयघोष करीत ही अंतिम यात्रा अकरा वाजता कन्हान नदीवरील हरदास घाटावर पोहोचली.

तिथे भंते सुरई ससाई व अखिल भारतीय भिक्खू संघाचे व महासंघाचे शेकडो भिक्षु तसेच राज्यातून आलेले व शहरातील हजारो उपासक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आला.

या प्रसंगी समता सैनिक दलाचे कमांडर सुनील सारीपुत्त ह्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात भन्ते घागघोष ह्यांच्या पार्थिवाला सलामी देऊन सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी भिक्खू करुणा बोधी, कुणाल कीर्ती, अश्वजीत, धम्मबोधी, नागसेन, धम्मरत्न, प्रज्ञानंद, धम्मसारथी, संघप्रकाश, बुद्धज्योती, धम्मदीप, धर्मशील, प्रियदर्शी, धम्मसेवक, धम्मानंद, आनंद, महानाग, बुद्धवंश, नागानंद, सुमेधबोधी, धम्मप्रिय, बुद्धप्रिय, राहुल, पंडितानंद, सुगत, धम्मविजय, नागशील आदी भिख्खू तसेच

भिक्षूनी यशोधरा, पटाचारा, संगमित्रा, धम्मदिना, रूपानंद, महाप्रजापती, विशाखा, गौतमी, वजीरा, बुद्धप्रिया, भद्रकालमीयनी, कल्याणी, मिथीला, पूनिका, आम्रपाली, धम्मनंदा, प्रजापति, थुलनंदा, नागकन्या, सुधम्मा, सुमेधा, संघप्रिया, बोधीशीला, गौतमी, सुनिता, सुप्रिया, आदी भिखुनी तसेच

सामाजिक क्षेत्रातील दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे, बसपाचे उत्तम शेवडे, गौतम पाटील, महेश साहारे, बुद्धम् राऊत, संजय जयस्वाल, शिशुपाल कोलटकर, साहेबराव शिरसाठ आदी विविध क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कन्हान येथील बुद्ध विहारातील भिक्षु संघाच्या विश्राम नंतर सायंकाळी पाच वाजता हरदास घाटावर नागघोष यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रमही भन्तेजी सुरेई ससाई, भिक्षु संघ व उपसकांच्या उपस्थितीत पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here