नागपूर – शरद नागदेवे
महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जेष्ट ऊपाध्यक्ष भैय्यासाहेब शेलारे यांचे कोरोना मुळे दुंःखद निधन झाले. भैय्यासाहेब शेलारे सहकार विभागात वर्ग 1 अधिकिरी होते निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक चळलळीत स्वतःला झोकुन दिले.कास्ट्राईब महासंघाचे जेष्ट ऊपाध्यक्ष पदावर असतांना अनेक लढ्याचे त्यांनीषनेतृत्व केले,
डाँ.बाबासाहेब आंबेडाकर को आंपरेटीव्ह बँक चे ते संचालक होते. कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांचे मार्गदर्शक तसेच सहकारी होते. कास्ट्राईब च्या लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. कास्ट्राईब महासंघाची स्थापना 1974 साली माजी सनदी अधिकारी एस.जी.सुरडकर यांनी केली..भैय्यासाहेब संस्थापक सदस्य होते.
आपल्या 50वर्षाच्या सामाजिक कार्यात काही काळ ते ऊदीत राज सोबत होते.ऊदीत राज यांनी भाजपमधे प्रवेश केल्यानंतरते परत मुळ कास्ट्राईब मधे अरुण गाडे यांच्या कास्ट्राईब मधे ते सामिल झाले.व अनेकवर्षापासुन कास्ट्राईब महासंघासोबत होते. त्यांच्या दुःखद निधनाने कास्ट्राईब महासांघाचे अपरिमित नुकसान झाले आहे.
माझा मोठा भाऊ ,व माझा मार्गदर्शक हरविला अशी प्रतिक्रिया अध्यक्ष अरुण गाडे यांनी दिली, श्यामराव हाडके,सिध्दार्थ ऊके,गजानन थुल, जे.एस.पाटील,महेद्र मानके,
सिताराम राठोड,कृष्णा मसराम,ई.झेड खोब्रागडे,डाँ.नितिन राऊत ऊर्जा मंत्री,अनुप मेढे,यांनी शोक संवेदना व्यक्त केली.भैय्यसहेब शेलारे यांच्या दुःखद निधनने कास्ट्राईब चळवळीचा मार्गदर्शक हरवला असल्याची भावना शामराव हाडके याःनी व्यक्त केली. आंबेडकरी चळवळीचा शिलेदार समाजाने गमावल्याची भावना आंबेडकरी समाजात आहे.