सावली बेघर निवारा केंद्रातील लाभार्थींनी उभारला दिवाळी साहित्य खरेदीचा स्टॉल…

बेघर लाभार्थ्यांच्या स्टॉलवरून साहित्य खरेदीचे उपायुक्त राहुल रोकडे यांचे आवाहन…

सांगली – ज्योती मोरे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या बाजारात महापालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रातील लाभार्थींच्या दिवाळी साहित्य विक्रीचा स्टॉल लावला आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचा या स्टॉलला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी बेघर स्टॉलवरून दिवाळी साहित्य खरेदीचे आवाहन मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगपालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या बेघर केंद्रातील बेघरांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय उपजीविका अभियानातंर्गत
आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दिवाळी साहित्य विक्रीचा स्टॉल बेघर केंद्रातील लाभार्थ्यांनी सांगलीच्या मध्यवर्ती बाजारात लावला आहे.

या स्टॉलवर दिवाळी साठी लागणाऱ्या आकर्षक पणत्या, कागदी आणि रंगीबेरंगी आकाश दिवे, विविध रंगी रांगोळी याचबरोबर फुलांच्या माळा आदी प्रकारचे साहित्य उपलब्ध आहेत. बेघर लाभार्थ्यांना सक्षम करण्यासाठी महापालिकेचा हा उपक्रम आहे.

त्यामुळे नागरिकांनी आपल्या दिवाळी साहित्याची खरेदी सावली बेघर केंद्राच्या मित्रमंडळ चौक , शाळा क्रमांक 1 च्या समोर असणाऱ्या विक्री केंद्रावरून करावी आणि बेघरांच्या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे आणि सावली बेघरचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here