शहीद आदिवासी गोवारी स्मारकाचे सौदर्यकरण करून द्या, चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्यावर कडक कारवाही करा…

आदिवासी गोवारी युवा जनविकास मंच ची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

रामटेक – राजु कापसे

नागपूर येथील ११४ शहीद आदिवासी गोवारी स्मारकाची तोडफोड आणि सुरक्षा संकळी चोरी गेल्या प्रकरणी आरोपीवर कारवाही करण्याची मागणी रामटेक चे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांचा मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदनामार्फत करण्यात आली.

निवेदनात शहीद स्मारक नागपूर येथील स्मारकावर सुरक्षा रक्षक नेमून तेथील सौंदर्यकरण करून देण्यात यावे अशी मागणी निवदनाद्वारे करण्यात आले.निवेदन देते वेळेस आदिवासी गोवारी जनवीकास मंच चे प्रदेश कार्याध्यक्ष श्री.नंदकिशोर कोहळे,

नागपूर जिल्हाध्यक्ष भास्कर राऊत,रामटेक तालुका अध्यक्ष अश्विन राऊत,रुपेश राऊत,भोला वघारे,सुखदेव शेंद्रे,रवी कोहळे,काशिराम शेंद्रे,राजू बाबा कवरे,मनोहर सोनवाने,पांडुरंग वाघाडे,किशोर चौधरी,विनोद चौधरी,सुनील नेवारे,सतिश गाडे,भगवान राऊत सहित रामटेक तालुक्यातील गोवारी समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here