बँकांनी कर्तव्यभावनेतून नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्यावा – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी…

सांगली – ज्योती मोरे.

बँकानी त्याचबरोबर विविध शासकीय विभांगानी शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवाव्यात. या योजनांचा लाभ देण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती नागरिकांना द्यावी. बँकांनी लोकांना कर्तव्यभावनेतून मदत करण्याच्या दृष्टीकोनातून कामकाज करून नागरिकांना लाभ द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने वाडीकर मंगल कार्यालय, ‍विश्रामबाग, सांगली येथे आयोजित ग्राहक जनसंपर्क मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक महेश हरणे, नाबार्डचे महाव्यवस्थापक एल. पी. धानोरकर, कृषि अधिकारी टी. एस. नागरगोजे आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमात बँकांचे प्रतिनिधी यांनी पीक व शेती कर्ज, मुद्रा योजना, उद्योगांसाठी सरकारी योजना PMEGP / CMEGP, STAND UP योजना, AIF, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी योजना, विमा योजना यांची ‍ सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here